खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कंत्राटी कामगारांचा मृत्यू

0

 

*तोल जाऊन ३० मिटर उंची वरून पडला खाली*

 

स्थानिक औष्णिक वीज केंद्रातील क्रेशर हाऊस परिसरातील

स्क्रॅप मटेरियल खाली फेकतांना ३० मिटर उंची वरून तोल जावून खाली पडल्याने एका कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना २६ मे शुक्रवारला दुपारी दुपारच्या सुमारास घडली त्यामूळे कामगार वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

मधुकर विठ्ठल लांडे वय ४१ रा.रोहना असे मृतक कंत्राटी कामगारांचे नाव आहे मधुकर हा ओरियन इंडस्ट्रीज कंपनी अंतर्गत ५०० मेगावॅट खापरखेडा औष्णिक वीज केंद्रा अंतर्गत असलेल्या कोळसा हाताळणी विभागा अंतर्गत कार्यरत होता.

 

घटनेच्या दिवशी २६ मे शुक्रवारला दुपारी २.३० च्या सुमारास क्रेशर हाऊस परिसरात ३० मिटर उंचीवर कार्यरत होता यावेळी स्क्रॅप मटेरियल रोप वे ने खाली फेकत असतांना मृतक कंत्राटी कामगार मधुकरचा अचानक तोल जाऊन खाली पडला सदर घटनेची बातमी परिसरात वाऱ्या सारखी पसरली यावेळी शेकडो कामगारानी घटनास्थळावर गर्दी केली होती सदर घटनेचे गांभीर्य ओळखून वीज केंद्राचे रुग्ण वाहिकेने नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र मधूकरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला मात्र मधुकरचा मृत्यू घटनास्थळावर झाल्याची चर्चा कंत्राटी कामगार वर्तुळात आहे.

मधुकर हा सर्वसामान्य कुटुंबातील होता त्याला पत्नी व दोन मुले असल्याची माहिती मिळाली आहे

.