केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज (27 मे) वाढदिवस (Nitin Gadkari 64th Birthday) आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह अनेक राजकीय आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांच्याकडे सध्या रास्तेवाहतूक, राष्ट्रीय महामार्ग आणि जहाज बांधणी तसेच जलसंसाधन, नदी विकास आदी मंत्रालयांचा कारभार आहे. या आधी 2010 ते 2013 या काळात ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिले आहेत. नागपूर जिल्ह्यात जन्मलेले नितीन गडकरी सध्या देशातील एक प्रमुख नेते आहेत. त्यांनी कॉमर्स विषयातून पदव्यूत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच, कायदा आणि व्यवसाय व्यवस्थापन विषयांतही त्यांनी शिक्षण घेतले आहे. यासोबतच ते एक उद्योगपतीही आहेत.
नितीन गडकरी हे राजकारणी असण्यासोबत एक उद्योगपतीही आहेत. ते बायो-डीजल पंप, साखर कारखाना, इथनॉल ब्लेंन्डिंग संयत्र, या शिवाय इतरही अनेक उद्योग व्यवसायांमध्ये त्यांनी पदार्पण केले आहे. नितीन गडकरी यांनी 1976 मध्ये नागपूर विद्यापीठातून शिक्षण घेत असतानाच राजकारणात प्रवेश केला. ते भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात आले. त्यांनी काही काळ भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपदही भूषवले. विशेष म्हणजे वयाच्या 23 व्या वर्षी गडकरी यांनी हे पद भूषवले.
मनसा सततं स्मरणीयम्. मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयम्…
वाढदिवसाच्या निमित्तानं काय संकल्प केलाय असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “मी माझ्या ऑफिसमध्ये एक संस्कृतमधलं पद्मश्री डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांच्या गाण्यातलं एक वाक्य लिहिलं आहे. मनसा सततं स्मरणीयम्. मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयम्… असं ते वाक्य आहे,” असं गडकरी म्हणले.
राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक विकासाचं साधन
तसेच पुढे बोलताना, “मी मानतो की राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक विकासाचं साधन आहे. जे शोषित आहेत, पीडित आहेत, दलित आहेत, सामाजिक आर्थिक आणि शैक्षिणक विकासापासून जे दूर आहेत (त्यांच्यासाठी काम करायचं) हा जो पंडित दिनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार आहे त्यासाठीच मी स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून जेवढं काम करता येईल तेवढं केलं पाहिजे. ते प्रयत्न मी सतत करत राहील,” असं गडकरी म्हणाले.आज नितीन गडकरींना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसत आहे. अनेकजण रांगेत उभं राहून गडकरींना भेटायला येत आहे. गडकरींच्या घराबाहेर शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने एक मंडप उभारण्यात आलाय.