वोक्हार्टमध्ये महेंद्र असाती यांना मुलामुळे पुर्नजीवन

0

 

-यकृत प्रत्यारोपण,प्रो.डॉ.टॉम चेरियन यांनी दूर केले गैरसमज

नागपूर : 53 वर्षीय महेंद्र असाती यांचे यकृत(लिव्हर)हे पूर्णपणे निकामी झाले होते.प्रत्यारोपणाशिवाय जगण्याची शक्यता, ही फक्त १० टक्के होती. प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती.नागपूरातील अनेक नामांकित रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले मात्र कोणताही फायदा त्यांना झाला नाही, हैदराबाद येथेही ते उपचार घेऊन आले. अखेर त्यांनी शंकरनगर येथील वोक्हार्ट रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार व गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि यकृततज्ज्ञ असे डॉ.पियुष मरुडवार यांची भेट घेतली. तातडीनेत्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले. सिरोसिस असलेल्या या रुग्णाला प्रो.डॉ.टॉम चेरियन यांच्या नेतृत्वाखालील चमूने, लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट(एलटी)साठी नेले.दूर्मिळ एबी पॉझिटीव्ह रक्तगट व सतत आयसीयूमध्ये दाखल असल्याने त्यांचे यकृत पूर्णपणे निकामी झाले होते.

 

महेंद्र यांच्या तरुण मुलाचे यकृत,त्यांना जीवनदान देण्याच्या कामी पडणार होते.या पूर्वीचा अनेक नामांकित रुग्णालयातील अनुभव त्यांना मानसिक,शारीरिक आणि आर्थिकरित्या थकवणारा होता.यातच त्यांच्या तरुण मुलाचे लग्न होऊन फक्त सव्वा वर्ष झाले होते आणि त्याची पत्नी ही गरोदर होती.त्यामुळे डॉ.पियुष मरुडवार,डॉ.चेतन शर्मा क्रिटिकल केअरचे प्रमुख तसेच डॉ.अवंतिका जैस्वाल ज्या तज्ज्ञ भूलतज्ज्ञ आहेत त्यांनी असाती कुटूंबियांचे योग्य समुपदेशन केले.कॅडेव्हर लिव्हर मिळण्यासाठी जवळपास आठ महिन्यांचा कालावधीही लागू शकणार होता मात्र महेंद्र यांच्याकडे तेवढा वेळ नव्हता.परिणामी त्यांच्या तरुण मुलाने धाडस करुन वडीलांना आपल्या यकृताचा ६७ टक्के भाग दान केला.

 

महेंद्र यांचा मुलगा तरुण असल्याने त्याचे शरीर हे ३३ टक्के यकृताच्या संचालनावर ही सुचारु रुपाने कार्यरत राहणार होते.इतकंच नव्हे तर आपल्या शरीराची रचनाच एवढी अलौकिक असते की काही काळानंतर आपलं शरीर, अंतर्गत रचना स्वत:च पूवर्वत करीत असतो,असे वोक्हार्ट येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.टॉम यांनी सांगितले.प्रतिक्षा यादीत असताना अनेक रुग्ण दगावण्याची संख्या ही फार मोठी असल्याने महेंद्र यांच्या मुलाने आपल्या यकृताचा भाग वडीलांना दान दिला व त्यांचे जीवन वाचविले.

 

आतापर्यंत लिव्हरच्या गुंतागुंतीच्या ट्यूमरसाठी लिव्हर शस्त्रक्रिया सेवा अस्तित्वात नव्हती आणि अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सेवांच्या अभावामुळे अनेक शस्त्रक्रिया करुन बरे होऊ शकणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात दगावले असल्याचे डॉ.टॉम चेरियन यांनी याप्रसंगी सांगितले.
जिवंत दाता लिव्हर ट्रान्सप्लांट (एलटी) हे जगातील सर्वात जटिल ऑपरेशन आहे. हे कॅडेव्हरिक प्रत्यारोपणापेक्षा कितीतरी पटीने अधिक क्लिष्ट आहे कारण जिवंत दात्यांसोबत दोन लोकांना एका लिव्हरने जगावे लागते.

 

प्रा.डॉ. टॉम चेरियन हे दोन दशकांपासून लिव्हर प्रत्यारोपणात गुंतलेले आहेत आणि त्यांनी ७०० हून अधिक लिव्हर प्रत्यारोपण केले आहेत, ज्यापैकी ४०० हून अधिक प्रत्यारोपण त्यांनी ते भारतात परत येण्यापूर्वी लंडनमध्ये केले आहेत.वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचे सेंटर हेड अभिनंदन दस्तेनवार यांनी सांगितले, की आम्ही अशा जटिल शस्त्रक्रियेसाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कठोर परिश्रम घेत लोकांच्या जीवनात बदल घडवून आणल्याचा आम्हाला नितांत अभिमान आहे.