सात दिवसांत सात वाघांनी गमावला जीव
चंद्रपूर. जिल्ह्यातील ताडोबाच्या बफर क्षेत्रात काहीच दिवसांपूर्वी तीन दिवसांच्या फरकाने सहा वाघांचामृत्यू झाला. त्याता आता आणखी एकाने भर पडली (Death session of tigers continues in Chandrapur district) आहे. ब्रह्मपुरी वनविभागातील नागभीड वनपरिक्षेत्रातील (Nagbhid forest area of Brahmapuri forest division) चिंधीचक जंगलातील हुमा (किटाळी) बिट क्रमांक ६४६ मध्ये ही घटना उघडकीस आली. दोन वाघांच्या झुंजीत किंवा रानकुत्र्यांसोबत झालेल्या झुंझित या नर वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वनखात्याने वर्तवली आहे. हा वाघ सुमारे अडीच वर्षांचा (dead tiger was about two and a half years old ) होता. घटनेची माहिती मिळताच नागभीड वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. वाघाच्या मृतदेहावर मागील बाजूला व गळ्याला गंभीर जखम झाल्याने हा वाघ ठार झाल्याचे पंचनाम्यात दिसून येते. सकाळी दोन नर वाघांमध्ये झुंज झाली असावी. यामध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. ही झुंज सकाळी झाली असावी, असे वाघाच्या मृतदेहावरून दिसून येते, असे वनविभागाचे म्हणणे आहे. ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक धोडने, नागभीडचे वनपरिक्षेत्राधिकारी हजारे, ब्रह्मपुरीचे गायकवाड, एनटीसीएचे बंडू धोत्रे, विवेक करंबेकर, पशुसंवर्धन विकास अधिकारी, झेडपीचे अध्यक्ष व त्यांची टीम यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास वनविभाग करीत आहेत.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांत वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना परत वाघ ठार झाल्याची घटना घडल्याने चिंतेचे वातावरण आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात ४ डिसेंबर रोजी वाघाचे चार बछडे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.
दोनच दिवसांपूर्वी १ डिसेंबर रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात आगरझरी कक्ष क्र. १८९ मध्ये सुमारे ६ ते ७ महिन्यांचा एक मादी बछडा मृतावस्थेत आढळून आला होता. या मादी बछड्याचा मृत्यू इतर नर वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे शरीरावरील खुणा तसेच घटनास्थळावरील परिस्थितीवरून दिसून आले होते. या चारही बछड्यांना नर वाघाने ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज फिल्ड डायरेक्टर जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केला होता.
वनविभागाने दिलेल्या माहिती नुसार गुरूवार १ डिसेंबर रोजी कंपार्टमेंट क्रमांक २६५ मध्ये ३-४ महिने वयाची चार वाघांची पिल्ले दिसली. ३० नोव्हेंबर रोजी टी-७५ या वाघीणीचा कुजलेला मृतदेह याच परिसरात आढळला होता. तेव्हापासून आरएफओ शिवनी पीआरटी सदस्यांसह कर्मचारी शोध पथक या बछड्यांवर लक्ष ठेवून होते.
शुक्रवार २ डिसेंबर २०२२ रोजी त्याच परिसरात एक नर वाघ आढळून आला होता. शनिवार ३ रोजी शोधा दरम्यान शोध पथकाला वाघाच्या चारही पिल्लांचे (२ नर आणि २ मादी) मृतदेह आढळून आले. आणि परिसरामध्ये नर वाघाचे अस्तित्व दिसून आले.
चारही मृतदेह चाव्याच्या जखमांसह सापडले आहेत. आणि ते नर वाघाने मारले असल्याचे उघड आहे. त्याच परिसरात २ नर आणि एका दुसऱ्या मादीची उपस्थिती असल्याने आईची ओळख पटलेली नाही. कॅमेरा ट्रॅप्स लावून आणि क्षेत्रीय कर्मचारी तैनात करून परागंदा वाघांच्या उपस्थितीसाठी आणि हालचालीसाठी परिसरात आणखी सखोल निरीक्षण सुरू ठेवण्यात येईल असे रामगावकर यांनी सांगितले.
दुसऱ्या घटनेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात गुरूवारी एक वाघीण मृतावस्थेत आढळली. मृत वाघीण अंदाजे १४ ते १५ वर्षांची होती. तिचे अवयव व कातडी कुजलेली आढळून आली.