पंतप्रधानांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था

0

परवनगी शिवाय ‘परिंदा भी पैर नही मार सकता’ : २४० सीसीटीव्ही, शेकडो पोलिस


नागपूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या (Nagpur – Bilaspur Vande Bharat Express ) उद्घाटनासह समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त 11 डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर येत आहे. होणार असून नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी नागपूर रेल्वेस्थानकावर २४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सोबतच पोलिस विभागानेही चोख नियोजन केले असून शेकडो पोलिसांची बहुस्तरीय सुरक्षा (multi-level police security) मोदींना पुरवली जाणार आहे. ‘परिंदा भी पैर नही मार सकता’ अशाप्रकारची कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. पंतप्रधान ११ डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेसला ते हिरवा कंदील देणार आहे. यासाठी ते विमानतळावरून नागपूर रेल्वेस्थानकावर येत आहेत. रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे देखील भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी रेल्वेने तयारी केली असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.


नागपूर रेल्वे स्थानकावरील २४० सीसीटीव्ही कॅमेरे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असतील आणि या सर्व हालचाली रेल्वे सुरक्षा दलाच्या कक्षात दिसणार आहेत. पंतप्रधान तेथून मेट्रोने खापरी मेट्रो स्थानकावर येतील. त्यानंतर समृद्धी एक्सप्रेस वे आणि एम्सचे लोकार्पण करतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (एमएसआरडीए)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीत संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. कार्यक्रमांची तयारी युद्धस्तरावर केली जात आहे.


पावसाचे सावट


पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. प्रशासनाककडून जय्यत तयारी केली जात आहे. मात्र, हवामान विभागाने १० ते १२ डिसेंबरदरम्यान नागपूरसह विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या दौऱ्यावर पावसाचे सावट असणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे. त्याचा परिणाम म्हणजे विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. सध्या वातावरणात देखील बदल झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. मिहानमधील एम्सच्या परिसरात त्यांची सभाही होणार आहे. त्यासाठी या परिसरात मोठा मंडप टाकण्यात येत आहे. ही लगबग सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे ११ आणि १२ डिसेंबरला पावसाच्या सरी कोसळू शकतात.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा