लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर कीर्ती फाउंडेशन आयोजित व सृजन ओव्हिओज प्रस्तुत मंगल दीपसंध्या जयप्रकाश नगर येथील आमराई ग्राउंड येथे पार पडली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रा. अनिल सोले, प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, उद्योजक अनिल सावरकर, नगरसेवक प्रकाश भोयर व के के बिल्डर्सचे पराग खोत, कीर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर धर्मे व सचिव विशाल महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसिद्ध गायक अमर कुळकर्णी यांनी वक्रतुंड महाकाय या ईशस्तवनाने दीपसंध्येला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जयोस्तुते हे गीत सादर करीत वातावरण भारावून टाकले. कानडा राजा पंढरीचा, माझे माहेर पंढरी यासारखी अनेक भक्तीगीते सादर करून त्यांना दीपसंध्येमध्ये भक्तींचा रंग भरला. कार्यक्रमाचे निवेदन मृण्मयी कुळकर्णी यांनी केले.