देवाभाऊच मुख्यमंत्री

0
नागपूर (Nagpur):महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल काही दिवस रखडलेला निर्णय आता जाहीर झाला असून, भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची निवड घोषित झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे पाच डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री यांच्या समवेत दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती, भाजपा विधिमंडळ बैठकीसाठी दिल्लीहून आलेले निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत स्पष्ट करण्यात आली आहे.