मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP नेते व शिंदे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे DHNANJAY MUMDE यांनाही धमकीचा फोन आला आहे. (Threat to Minister Dhananjay Munde) धमकी देणाऱ्याने त्यांना ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी देखील केली आहे. मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील परळी या गावातील निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी दिल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून लवकरच धमकी देणारी व्यक्ती गजाआड होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. कालच मंत्री छगन भुजबळ यांना देखील धमकी मिळाली होती. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यावर त्याने दारुच्या नशेत धमकी दिल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. NCP leader and minister in Shinde government Dhananjay Munde has also received a threatening phone call. (Threat to Minister Dhananjay Munde) The threatener has also demanded a ransom of Rs 50 lakh
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यावर भुजबळ व मुंडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे या दोघांना एकापाठोपाठ धमक्या मिळणे, हा योगायोग आहे की कसे, याचा शोधही पोलिस घेत आहेत. भुजबळ यांना धमकी प्रकरणी पोलिसांनी प्रशांत पाटील या इसमाला अटक केली आहे. मुंडे यांना मिळेलेली धमकी खोडसाळपणा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.