भाजपला पराभवाचा तिसरा धक्का
अमरावती. विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाची (Amravati Division Graduate Constituency) निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade)आणि भाजप (BJP) उमेदवार ऱणजित पाटील यांच्यात थेट लढत झाली. तब्बल २८ तासांपासून मतमोजणी सुरू होती. रणजित पाटलांचा पराभव करीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी विजय मिळविला आहे. धीरज लिंगाडे यांनी त्यां चे निकटचे प्रतिस्पझर्धी भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांचा ३ हजार ३६८ मतांनी पराभव केला. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपला हा तिसरा धक्का बसला आहे. धीरज लिंगाडे यांना एकूण 46344 मते पडली, तर भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना 42962 मते मिळाली. एकूण 23 उमेदवार रिंगणात होते.
अमरावती मतदारसंघात ३० जानेवारी रोजी एकूण ४९.७५ टक्के मतदान झाले होते. मतमोजणी केंद्रावर गुरूवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या मतमोजणीची गती संथ होती. पहिल्या पसंतीच्या८ मतमोजणीअखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांना ४३ हजार ३४० तर भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांना ४१ हजार २७ मते प्राप्तं झाली होती. लिंगाडे यांची आघाडी ही त्याावेळी २ हजार ३१३ मतांची होती. वैध मतांची संख्या ही ९३ हजार ८५२ इतकी असल्या्ने विजयासाठी आवश्येक मतांचा कोटा हा ४६ हजार ९२७ मते इतका निश्चित करण्यात आला होता. धीरज लिंगाडे हे कोटा पूर्ण करू शकले नाहीत, पण सर्वाधिक मते प्राप्तक करून ते विजयी ठरले आहेत.
लिंगाडे यांनी विजयानंतर आनंद व्यक्त केला. शिक्षक आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते एकदिलाने सोबत राहिल्यानेच हा विजय मिळविता आहे. जुनी पेन्शन योजनेसाठी पूर्वीपासूनच लढा देत आहे. आता नक्कीच अधिक जोरकसपणे जुना पेन्शनचा मुद्दा रेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्ते, कुटुंबीयांनी त्यांच्या विजयानंतर आनंदोत्सव साजरा केला.