पूर्वीची आणि आताची काँग्रेस यात फरक

0

 

 डॉ. राजेंद्र गवई (Dr. Rajendra Gavai)

अमरावती (Amravti)– आधीच्या आणि आताच्या काँग्रेसमध्ये फरक आहे. आजची काँग्रेस मित्र पक्षांना ताकद द्यायची, आताची काँग्रेस मित्र पक्षांना संपवण्याचे काम करत आहे. स्वतःचे हात, स्वतःचे डोळे, स्वतःचे पाय, ते स्वतः फोडतात असा आरोप रिपा नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी केला आहे. रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई अमरावती लोकसभेसाठी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.

आमचा संविधान बचाव हा उद्देश असणार आहे, आम्ही महाविकास आघाडीचे घटक होतो, कोरोनानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये माझा एकच रिपब्लिकन पक्ष महाविकास आघाडी सोबत होता.आज त्यांनी मला उमेदवारी नाकारली आहे. त्याच्या मागचं एकच कारण आहे की मी एस सर, एस मॅडम म्हणणारा नाही. सगळ्यांनी मला सपोर्ट करावा मी बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा निरोप पाठवला आहे. माझे आणि बाळासाहेबांचे संबंध चांगले आहेत. मी त्यांना मोठ्या भावासारखे मानतो, त्यामुळे ते मला समर्थन देतील असेही म्हणाले.