अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) परिसरात वराहांचा मुक्त संचार असल्याने घाणीचे साम्राज्य वाढले आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे रुग्णालय परिसरात सर्वत्र चिखल तसेच सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या ठिकाणी भरती असलेल्या गर्भवती महिला तसेच नवजात शिशुचे आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने वराहांच्या संदर्भात वारंवार तक्रार करुनही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे आरोग्य प्रशासनाचे मत आहे.
डफरीन रुग्णालयातील अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. रुग्णालयात वर्ग-४ च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर रुग्णालयातील स्वच्छतेचा ताण जास्त आहे. तसेच या रुग्णालय परिसरातच मध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे रुग्णालय परिसरात सर्वत्र चिखल व घाण साचल्याचे चित्र दिसून येते.
उपजिल्हा रुग्णालयाची खा.डॉ.अनिल बोंडे यांनी घेतली झाडाझडती
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णहिताच्या दृष्टीने आढावा बैठक राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी घेतली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या विविध मागण्या लक्षात घेता त्या तत्काळ मंजूर करून त्यामध्ये आवश्यक बदल करण्याच्या सूचना देखील त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांना विविध बाबींमध्ये रुग्णहितार्थ सुधारणेसाठी आवश्यक त्या सूचना कळत त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी दिले.