आज बजेटवर चर्चा

0

भाजपचे आयोजन ः सुधीर मुनगंटीवार उलगडणार बारकावे

नागपूर. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Union Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी बुधवारी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget ) मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प असा त्याचा उल्लेख केला. या अर्थसंकल्पातून समाजातील प्रत्येक घटकाला काहीना काही देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. अर्थसंकल्पातील बारकावे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यादृष्टीने भारतीय जनता पक्षाच्यातर्फे (BJP) महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘बजेट पर चर्चा’ (Discuss on budget) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच शृंखलेत शनिवारी 4 फेब्रुवारीला सायंकाळी 6.30 वाजता व्हेरायटी चौकालगतच्या वायएणसीए कॉम्प्लेक्समधील आशीर्वाद लॉन येथे कार्यक्रम होणार आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री व विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) यंदाच्या अर्थसंकल्पातील बारकावे उलगडतील.

भारतीय जनता पक्ष आणि भाजप आर्थिक प्रकोष्ठच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना केंद्रीय प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चार्टेड अकाउंटंट जयंत रानडे उपस्थित राहतील. शहरातील उद्योजक, व्यापारी, सीए, सीएस असे आर्थिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या विविध क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वसामान्यांकडून प्रश्नही मागविण्यात आले आहे. बजेट पर चर्चा कार्यक्रमातून प्रत्येक शंकेते निरसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक अशा प्रत्येकट घटकासाठी अर्थसंकल्पात कोण-कोणत्या तरतुदी आहेत, याची माहिती मुनगंटीवर देतील.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी आज पत्रकार परिषदेतून या उपक्रमासंदर्भात सविस्तर माहिती दिली. राज्याच्या अर्थसंकल्प तयार केला जात आहे. त्यासाठी सूचना व शिफारशी मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून देता येणार आहे. पत्रकार परिषदेला आमदार विकास कुंभारे, माजी आमदर गिरीश व्यास, गिरीश देशमुख, जुल्फेश शाह आदी उपस्थित होते.