बच्चू कडू यांनी जिल्हा शल्यचिकित्सकाची केली कानउघडणी
अमरावती: दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी (ता.१०) सायंकाळी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला) भेट दिली. येथील दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली.
अचानक भेट दिल्याने या रुग्णलायात काही काळ तारांबळ उडाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे उपस्थित होते. दिव्यांग रुग्णांच्या वॉर्डात त्यांनी भेट दिली. काही बेडवर दोन दोन रुग्ण पाहून त्यांनी डॉक्टरांना जाब विचारला.