जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेसी : पञकार विमा योजनेचा शुभारंभ
चंद्रपूर. पूर्वीची पञकारिता आणि आताच्या पत्रकारितेचे स्वरूप बदलले (nature of journalism has changed ) आहे. वृत्तपत्रे प्रचलित झाल्यापासून समाजाच्या जडणघडणीच्या प्रत्येक टप्प्यावर वृत्तपत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे, अशी भावना जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेसी (Superintendent of Police Ravindra Singh Pardesi ) यांनी व्यक्त केली. जनता आणि पोलिस यामधील दुवा म्हणून काम करणाऱ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच आपलीही जडणघडण झाल्याची ग्वाही त्यांनी दिली. चंद्रपूर जिल्हा व्हाँईस ऑफ मीडियाच्या वतीने स्थानिक होटल सिध्दार्थच्या सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार दिन आणि पत्रकार विमा पॉलिसी (Journalist Insurance Policy) शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी व्हाईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांच्यासह सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, यशवंत डोहणे, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे आणि लोकमतचे नागपूर शहर मुख्यप्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी दीप प्रज्वलन आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून व्हाईस ऑफ मीडियाच्या पाच प्रतिनिधींना दहा लाख रुपयांच्या विमा पॉलिसीचे वितरण आणि ओडखपञाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कहीकर यांनी वर्तमानपत्रातील बदलते स्वरूप पत्रकारांसमोर मांडले. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यांच्यातील भेद उलघडून दाखवतांना मीडियातील बदलत्या स्वरुपाचा पत्रकारांनी स्वीकार करावा, असे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर आणि जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेसी यांचे हस्ते वसंत खेडेकर, गोपालकृष्ण मांडवकर, यशवंत डोहणे आणि संजय तायडे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती वसंत खेडेकर, गोपालकृष्ण मांडवकर आणि संजय तायडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या स्थापनेमागील भूमिका विषद करतांना संघटनेच्या पंचसुत्रीवर प्रकाश टाकला. जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे संघटक विनायक रेकलवार यांनी संचलन आणि अमर बुध्दारपवार यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारीणी पदाधिका-यांसह तालुकाध्यक्ष आणि तालुका कार्यकारीणी सदस्य व जिल्हातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.