बायको गेली माहेरी अन् संतप्त मुलाने केला आईचा खून

0

गोंदियाच्या शिवनगरातील घटना


गोंदिया. पती-पत्नीत टोकाचा वाद झाला. पत्नी रागाच्या भरात माहेरी निघून गेली. याच तनावातून मुलाने खाटेच्या ठाव्याने डोक्यावर मारून विधवा आईचा खून (Son murdered his mother) केला. ही थरारक घटना गोंदिया शहरातील शिवनगर (Shivnagar in Gondia city ) परिसरात घडली. लक्ष्मी भजनलाल पल्लारे (५४) रा. शिवनगर, भगतसिंग वॉर्ड, विजयनगर असे मृत महिलेचे नाव आहे. तर दुर्गेश भजनलाल पल्लारे (२८) आसे आरोपी मुलाचे नाव आहे. याचा ७ जानवारी रोजी घरीच आपल्या पत्नीसोबत वाद झाला. कडाक्याच्या भांडणानंतर पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. त्यानंतर आरोपीही घरातून बाहेर निघून गेला. जाताना आई लक्ष्मी पल्लारे यांना घरातच राहण्यास सांगितले होते. पण, आरोपी घरी परत आला असता आईसुध्दा घराबाहेर गेल्याचे माहिती झाले. आई घरी परत येताच आरोपीने तिच्याशीही भांडण करून घरातील खाटेच्या लाकडी ठाव्याने तोंडावर, डोक्यावर व पाठीवर मारून गंभीर जखमी केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मी पल्लारे यांना रुग्णवाहिकेने रूग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आरोपीची मामी पूर्णा डिलुचंद खरे (५५, रा. विमलताई शाळेजवळ, विजयनगर) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कुरसुंगे करीत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
जादूटोण्याच्या संशयातून खुनाचा प्रयत्न
डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कणेरी शेतशिवारावर रूका लखा मेश्राम (८५, रा. कनेरी) यांना आरोपी ईश्वरदास गुरुदास वाढई (४५, रा. कनेरी) याने तु माझ्यावर जादूटोणा करून माझ्या घराचा नाश केलास असे रागाचे भरात बोलून डोक्यावर लोखंडी पात्याचे कुऱ्हाडीने मारून खुनाचा प्रयत्न केला. संपत रूका मेश्राम (५०, रा. कनेरी) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद बांबोळे करीत आहेत.