दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू तरी घटना ठेवली लपवून

0

कारण वाचून बसेल धक्का…


यवतमाळ. नेर शहरात (Ner city) रविवारी दुपारी गंभीर घटना घडली. येथील वली साहेबनगर परिसरातील सहा मित्र पोहण्यासाठी दारव्हा (Darvha) मार्गावरील पाझर तलावाकडे गेले. हरण टेकडीजवळ असलेल्या या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पोहत असताना दोघेजण या गाळात फसले. यातच त्यांचा बुडून (Two students drowned ) मृत्यू झाला. ही माहिती इतर चौघांनी कुटुंबियांना दिली. त्यानंतर तत्काळ त्या दोन मुलांचे मृतदेह परस्परच तलावाबाहेर काढण्यात आले. या घटनेबाबत प्रचंड गोपनियता ठेवण्यात आली. इतकेच काय घटनेचे वृत्तसुद्धा दिले जाऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली. या गंभीर घटनेने नेर शहरात खळबळ उडाली असून, विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिस व प्रशासनाला घटनेची माहिती मिळाल्यास मृतांची शवविच्छेदन केले जाईल, या भीतीतून घटनेची माहिती लपविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण, त्यावर विश्वास ठेवणे सर्वांनाच कठीण जात आहे.
सहा मित्र रविवारी घरून बाहेर पडले. त्यांनी उर्दू स्कूलमध्ये स्नेहमिलन बघितले. तिथून पोहण्यासाठी पाझर तलावाकडे पोहोचले. तेथे पोहत असताना दुपारी १:३०च्या सुमारास दोघेजण बुडाले. या तलावात ब्लास्टिंग केल्याने मोठमोठे खड्डे आहेत. त्यात गाळ साचला आहे. या गाळातच पोहताना ते दोघेजण फसले असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या अन्य चौघांनी थेट घराकडे धूम ठोकली.
त्यांनी दोघेजण बुडाल्याची माहिती कुटुंबियांना दिली. यातील एक १६ वर्षांचा तर एक १८ वर्षांचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मृतांचे नाव समजू नये, यासाठी प्रचंड गोपनियता बाळगण्यात आली. त्यामुळेच मृत विद्यार्थ्यांची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. ही घटना घडल्यानंतर तत्काळ मृतदेह बाहेर काढून सायंकाळी त्यांच्यावर दफनविधी करण्याच्या हालचाली सुरू होत्या. एवढी मोठी घटना घडूनही गोपनियता बाळगली जात असल्याबाबत शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे.
विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याबाबत पोलिसांकडे कुठलीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे तशी कुठलीही नोंद नाही. मात्र, या घटनेबाबत चौकशी करून नेमका काय प्रकार आहे, हे शोधले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा