वर्ध्यात गुन्हेगारी टोळीचा धुमाकूळ

0

गौरक्षण वॉर्डात निघाल्या चाकू-तलवारी ; युवकाला मारण्याची धमकी, सहा आरोपींना बेड्या


वर्धा. जुन्या वादाच्या कारणातून युवकाच्या घरासमोर दुचाकींवरू येत चाकू अन् तलवारी भिरकवून जिवे मारण्याची धमकी (Death threats ) देत खिशातून रोख रक्कम हिसकावत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना वर्धा शहरातील गोरक्षण वॉर्ड (Gaurakshan Ward in Wardha city) परिसरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी (Ramnagar Police ) सहा आरोपींना बेड्या ठोकल्या. तर उर्वरित आरोपी फरार असून, त्यांचाही कसोशीने शोध घेण्यात येत आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. संदेश ऊर्फ बादल महेंद्र शेंडे (रा. गौरक्षण वॉर्ड) याचा इतवारा परिसरातील गुन्हेगारी टोळीतील सदस्यांसोबत जुना वाद होता. यापूर्वी देखील टोळीतील सदस्यांनी संदेश शेंडे याच्या पत्नीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शिवीगाळ केली होती. याच वादातून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केल्याचे सांगितले ताज आहे.


घटनेच्या दिवशी आरोपी दिनेश पांडे, सोहेल ऊर्फ आफताब मोंडा, रुतीक तोडसाम, दादू भगत, आदित्य ऊर्फ टकी खत्री, साहील गौतम राऊत, समीर पठाण, प्रलय कदम, आशिक शेख, योगेश ऊर्फ भाऊ सूर्यवंशी, रेहांश शेख यांच्यासह चार ते पाच असे एकूण १५ ते १६ गुन्हेगारांची सशस्त्र टोळी पाच ते सहा दुचाकीवरून संदेश शेंडे याच्या घरासमोर आले. त्यांनी हवेत तलवारी, चाकू तसेच फरशा भिरकावून शिवीगाळ केली. आरोपींना पाहून संदेशने पळ काढला. दरम्यान, सर्व आरोपींनीह त्याच्या मागे धावत त्यास पकडून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दिनेश पांडे याने त्याच्या खिशातील पाचशे रुपये काढले. घाबरलेला संदेश अखेर अंधारात लपून बसला. याप्रकरणी संदेशने रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणात दिनेश पांडे, सोहेल मोंडा, रुतीक तोडसाम, दादू भगत, आदित्य खत्री आणि साहिल गौतम यांना अटक केल्याची माहिती दिली. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत. ही घटना समोर आल्यापासून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. काहींनी गँगवॉर भडकण्याची भितीही व्यक्त केली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा