लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (एलआयटी), नागपूर येथील बायोलॉजिकल टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या प्रमुख डॉ. आरती शनवरे यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे झालेल्या प्रतिष्ठित चौथ्या वार्षिक आंतरराष्ट्रीय एसडीजी परिषदेत व्याख्यान दिले.
भारतरत्न राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांनी स्थापन केलेल्या दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारा (डीआरआय) ‘बिल्डींग लोकल टू ग्लोबल लिंकेजेस अँड अॅसरलेटींग प्रोगेस टुवर्ड एसडीजीएस’ या विषयावर ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत आंतरराष्ट्रीय विचारवंत, तज्ज्ञ आणि चेंज मेकर्स एकत्र आले होते.
डॉ. शनवारे यांनी आपल्या व्याख्यानात ‘एसडीजी ७ – अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, एम्फसायजिंग इनोव्हेटीव्ह अॅप्रोचेस फॉर सस्टेनेबल एनर्जी सोल्यूशन्स’ विषयावर आपले विचार मांडले. शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि जागतिक ऊर्जेच्या उद्दिष्टांमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी एलआयटी विद्यापीठ आणि त्याच्या विभागाची वचनबद्धता अधोरेखित केली. मान्यवरांच्या हस्ते यावेळी डॉ. शनवारे यांचा सन्मान करण्यात आला.