पोलिसांची मोठी कारवाई
पुणे. सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची ओळख (Pune is known as the cultural capital). पण, हीच पुसण्याचे काम गेल्या काही काळापासून सुरू असल्याचे दिसते. पुढे येणाऱ्या घटनांमुळे पुण्याच्या लौकिकाला डाग लागतो आहे. याच पुण्यात आज संगीतकार ए. आर. रहमान यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारीही केली गेली आहे. रसिकांमध्ये मोठी उत्सूकता देखील दिसून येत आहे. पण, संगीताची ही मेजवाणी सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई करीत सव्वा दोन कोटींचे ड्रग्ज जप्त केले (Drugs worth two and a half crores were seized ) आहे. मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) पुण्यात मेफेड्रोन (MD) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणले जात होते. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपये किंमतीचा तब्बल एक किलो 108 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन जप्त करीत दोघांना अटक केली.
आझाद शेरजमान खान (35) व नागेश्वर राजाराम प्रजापती (35) दोघेही रा.पिपलखेडी, अलोट, रतलाम, मध्यप्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका लहान मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी हे दोघेजण आपली गस्त घालत होते. त्यावेळी मध्य प्रदेशातील काही व्यक्ती पुण्यात अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खराडी येथे सापळा रचून संबंधित वाहनाची तपासणी करण्यास सुरुवात केली. एक दुचाकी खराडीकडून पुण्याच्या दिशेने निघाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्यांना तत्काळ थांबविले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यावेळी त्यांच्याकडे 2 कोटी 21 लाख 60 हजार रुपये किंमतीचे व 1 किलो 108 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन, 31 हजार रुपयांचे 4 मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज जप्त केला.