अवकाळी पावसामुळे नागपूरच्या एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा शेतमालाची नासाडी

0

 

नागपूर : विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा इशारा हवामान खात्यांना दिला होता. शेतकऱ्यांनी शेतातील कापणीला आलेले पीक बाजारपेठात विकण्याचा सल्लाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला. पण असं असताना नागपूरच्या एपीएमसी कलमना मार्केट मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल खराब होत आहे. हरभरा, गहू,सोयाबीन, आणि लाल मिरचीचे पीक भरपूर आले आहे. पण लाल मिरची ठेवण्यासाठी शेड नसल्यामुळे लाल मिरचीचे पोते बाजारपेठामध्ये भिजत असल्याची स्थिती आहे. आणखी दोन दिवस अवकाळी पाऊस येणार असल्याने शेतमाल खराब होण्याची भीती आहे. याकरिता मार्केटच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांनी दोन चार दिवस माल बाजारात आणू नये. सरकारला अनेकदा मागणी करून पण शेड बनविले नाही.
शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला परंतु मालाला भाव न मिळाल्याने शेतकरी माल विकत नाहीयेत्. वर कहर म्हणजे, अवकाळी पावसामुळे माल खराब होत आहे.राज्यसरकार या वर लक्ष देत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.