अमरावती : जुन्या पेन्शन साठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे. तर दुसरीकडे सरकारने ही पेंशन देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. अशातच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. आमदार, खासदार यांना मिळणारी पेन्शन बंद करा, तसेच शेतकरी शेतमजुरांना व आरोग्य सेवेत काम करणाऱ्या लोकांना तातडीने पेन्शन लागू करा, अशी मागणी प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख यांचे बंटी रामटेके यांनी केली आहे.