चंद्रपूर, गडचिरोलीला भूकंपाचे धक्के!

0

तेलंगणाही हादरले : रिष्टर स्केलवर 3.1 तिव्रतेची नोंद

चंद्रपूर. गडचिरोली, चंद्रपूर (Gadchiroli, Chandrapur ) जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के (earthquake ) जाणवले. तेलंगणा राज्यातील (Telangana state) काही भागसुद्धा धरणीकंपाने हादरले. धक्के फारच सौम्य स्वरूपाचे असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोदावरी फॉल्ट परिसरात भूकंपाचे केंद्र असून ते जमिनीच्या 5 किमी आत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. भूकंपाची तीव्रता 3.1 रिस्टर स्केल नोंदविली गेली. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गोदावरी फॉल्ट परिसर हा भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात असून या भागांमध्ये अशाप्रकारचे भूकंपाचे सौम्य धक्के नियमित बाब असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मंगळवारी सामान्यस्वरूपात नागरिक आपआपल्या कामांमध्ये व्यस्त असताना सकाळी पावणे नऊच्या सुमारास जमीन आणि घर हलल्याप्रमाणे जाणवले. अनेकांना हे धक्केसुद्धा जाणवले नाही. पण, त्यांना जाणवले, त्यांनी घराबाहेर येऊन पाहणी केली. अनेकांनी जमीन हादरल्याबाबतचे वक्तव्य केल्यानंतर हा भूकंपाचाच धक्का असल्याचे स्पष्ट झाले.
सर्वप्रथम तेलंगणा राज्यातील कागझनगरजवळील दहेगाव भागात धरणीकंप जाणवला. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती अभ्यासकांनी दिली. गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता, भूकंपाबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, जमीन हादरल्याचे अनेकांचे म्हणणे असल्याने माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा