ईडीच्या तपासात 16 लाखांची रोख मिळाली

0

संघटित सिंडिकेटचा पर्दाफाश : भारत – म्यानमार सीमेवरून तस्करी


नागपूर. सुपारी व्यापाऱ्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केलेल्या कारवाईचा तडाखा संपूर्ण सिंडिकेटपर्यंत पोहोचला आहे. या छाप्यांमुळे इंडोनेशियन सुपारी पुरवठादार, कमिशन एजंट, वाहतूकदार, हवाला ऑपरेटर आणि खरेदीदार यांच्या सुसंघटित सिंडिकेटचा पर्दाफाश (Well organized syndicate exposed) झाल्याची माहिती सूत्राने दिली आहे. इंडोनेशियन सुपारीची भारत-म्यानमार सीमेवरून भारतात तस्करी (Smuggling of Indonesian betel nuts to India through Indo-Myanmar border) करण्यात या सिंडिकेटचा हात होता. ईडीने पाल्म 2002 अंतर्गत मुंबई आणि नागपूरमधील 17 ठिकाणांची झडती घेतली, ज्यात इंडोनेशियातील सुपारी तस्करीत गुंतलेल्या विविध व्यक्तींची कार्यालये आणि निवासी परिसर यांचा समावेश आहे. भारत-म्यानमार सीमेवरून सुपारी तस्करी केली जाते. ईडीच्या झडतीदरम्यान, पीएमएलए अंतर्गत सुमारे 11.5 कोटी रुपयांची तब्बल 289.57 मेट्रिक टन सुपारी जप्त करण्यात आली आहे. ईडीने 16.5 लाख रुपये रोख आणि विविध गुन्ह्यांशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त केली आहेत.


इंडोनेशियन सुपारी पुरवठादार, कमिशन एजंट, लॉजिस्टिक प्रदाते, वाहतूकदार, हवाला ऑपरेटर आणि खरेदीदार यांचे एक सुसंघटित सिंडिकेट असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. हे सिंडिकेट सरकारची फसवणूक करण्यासाठी एकत्र काम करीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. कर वाचविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून शासनाचीही दरमहा शेकडो कोटींची फसवणूक होत आहे. या कामात कोणत्या विभागांचे सहकार्य मिळत होते याचाही तपास ईडी करत आहे.


इंडोनेशिया येथून बनावट सुपारी आणून रासायनिक प्रक्रियेनंतर तिची विक्री केली जाते. सुपारीसारखा दिसणारे हे घटक आरोग्यासाठी अपायकारक आहे. केवळ पैसा कमावण्यासाठी हा संपूर्ण प्रकार चालविला जातो. प्रामुख्याने मध्य भारतात सुपारीची मागणी सर्वाधिक आहे. यामुळे या व्यवसायात गुंतलेले व्यापारी, एजेंटची संख्यासुद्धा या भागात अधिक आहे. बनावट सुपारी व्यवसायातील किंगला अलिकडेच गुवाहाटीत अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडी कडून नागपुरात मोठ्याप्रमाणावर धाडसत्र सुरू करण्यात आले. या झाडाझडतीत आश्चर्यकारक माहिती समोर आल्याचे सुत्रांकडून कळते.

चित्ता कटरा पनीर भुर्जी आणि अमृतसरी पनीर पकोडा|Paneer Bhurji & Amritsari Paneer Pakora Recipe|Epi 46