
नागपूर- अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १८व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनातील कला दालनात नागपूर येथील वैदर्भीय कला अकादमीचे नानू नेवरे यांचे शेतकरी आत्महत्या विषयांवरील ‘माझा शेतकरी चित्रप्रदर्शनाचा समावेश करण्यात आला आहे. कलाप्रकारांतून विद्रोह मांडणारे स्वतंत्र जगविख्यात चित्रकार केकी मूस कला दालनात शिल्प, चित्र, कॅलिग्राफी, स्केच, फलक लेखन, रेखाटन यासारख्या आधुनिक कला प्रकारांचे थेट सादरीकरण करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या विद्रोही संमेलनातील या कला दालनात राज्यातील विविध कलावंताच्या विशेष प्रदर्शनांचाही समावेश राहणार आहे. ब्लॅक अँड व्हाइट’ संगती ही प्रसिद्ध छायाचित्रकार नानू, नेवरे यांची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांसह दिल्लीतील शेतकरी आंदोलन, ‘मणिपूर पीस’, ‘माझा शेतकरी भन्न स्वप्नांचे वास्तव… या संकल्पनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जगण्याचे विदारक वास्तव नानू नेवरे हे सृजनात्मक आणि रचनात्मक छायाचित्रांच्या माध्यमातून मांडत असतात. वास्तववादातून अतिवास्तववादाकडे जाणारी कलात्मक यात्रा ते आपल्या छायाचित्रकारितेतून प्रभावीपणे साधतात. तृतियपंथीयांच्या विविध भावमुद्रा असलेल्या संकल्पनेवर सध्या ते काम करीत आहेत.
या छायांकिताची साईज ४ बाय ६ फुटाची असून २५ फोटोग्राफ प्रदर्शनीत आहेत.