अमरावती, 2 फेब्रुवारी दुष्काळ, कर्जबाजारीपणा, शेतमालाला मिळणारा तोकडा दर यामुळे शेतकऱ्यांची आज बिकट अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणे गरजेचे असताना निसर्गासह मायबाप सरकारने – शेतकऱ्यांची कायम साथ सोडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. – नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाचे दर घटल्याने शेतकरी चिंतेतसापडले आहेत. शेतकरी दरवर्षी कापसाच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. खासगी बाजारपेठेत कापसाचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी अस्मानी आणि – सुलतानी संकटात सापडले आहेत. दुष्काळ, कर्जबाजारीपणा, महागाई यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांचे दिवस आज वाईट असताना शेतकरी हिताचे निर्णय घेणे सरकारला आवश्यक आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा दिवसेंदिवस आहे. वाढत डोंगर चालला आहे.
नगदी पीक म्हणून शेतकरी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र, कापसाला खासगी बाजारपेठेत ६,६०० रुपयांपर्यंत तोकडा दर दिला जात आहे. त्या तुलनेत कापसावर केला जाणारा खर्च अधिक असल्याने कापसाचा अल्पदर शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
समीर जवंजाळ युवा शेतकरी