दि. 5 फेब्रुवारी 2023 रोजी
2 जानेवारी 1927 साली स्थापन झालेल्या सेवासदन शिक्षण संस्थेला मागील 96 वर्षाची भव्य परंपरा आहे. या परंपरेचा एक उपक्रम म्हणजेच माजी विद्यार्थ्यांचा ‘माहेर मेळावा’. दि. 5.02.2023 रोजी सेवासदन शिक्षण संस्थेत सकाळी 9.00 ते 5.00 या दरम्यान माजी विद्यार्थ्यांचा ‘माहेर मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या एकदिवसीय माहेर मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थ्यांकरीता विभिन्न उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्रीडा स्पर्धा, स्वानुभव कथन, सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्र सेविका समितिच्या प्रमुख संचालिका मान. श्रीमती शांताक्का या राहणार असून समारोपाला जेष्ठ निरूपणकार व विचारवंत मान. श्री विवेकजी घळसासी प्रमुख अतिथी स्थान भूषवणार आहेत. स्वर्गीय रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या सेवासदन शिक्षण संस्थेने आजवर अनेकांना स्वावलंबी करून समाजात मानाने जगण्याचे बळ दिले आहे. त्यामुळेच सेवासदन ख-या अर्थाने अनेकांचे प्रेरणास्थान ठरले आहे. सेवासदन मधून शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी हे आज समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. अशा गुणी विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल संस्था नेहमीच घेत असते. आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनाचे आयोजन संस्था ‘माहेर मेळावा” या उपक्रमातून करीत असते. संस्थेतर्फे आजवर दि. 3 व 4 जानेवारी 2001 व 4 जानेवारी 2014 मध्ये अनुक्रमे दोन माहेर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा दिनांक 5/2/2023 रोजी होणा-या माहेर मेळाव्यास महाराष्ट्रातील विविध जिल्हयातून विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. तसेच जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष मान. श्रीमती कांचन गडकरी सचिव मान. श्रीमती वासंती भागवत व संपूर्ण कार्यकारिणी ने केले आहे.
श्रीमती वासंती भागवत
सचिव
सेवासदन शिक्षण संस्था, नागपूर
फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |
https://youtu.be/G42Ch93dd9E