फटाका कंपनीत स्फोट, एक ठार भांडारज परिसर हादरला

0

वाडेगाव. सूर्य तळपू लागताच आगीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. मंगळवारी सकाळी पातूर पोलिस स्टेशन हद्दीतील तांदळी बेलुरा मार्गावर फटाका कारखान्यात स्फोट झाला (Explosion occurred in a firecracker factory on Tandali Belura road under Patur police station limits). या भीषण घटनेत एकाचा घटनास्थळीच मृत्यू (One died on the spot ) झाला. तर पाच ते सहा जण जखमी (Five to six people were injured ) झाल्याची माहिती समोर येत आहे. भांडारज शेतशिवरात फटाखा कारखान्यात हा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. स्फोटाचा आवाज लांबवर ऐकू आला. लगतच्या गावातील मंडळींनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. अनेकजण मदतीसाठी धावून आले. स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेत कारखान्याच्या खोल्या पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. सोबतच मालवाहून चारचाकी वाहनसुद्धा जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.

गावापासून लांब शेतशिवारातच हा कारखाना होता. फटाक्यांसाठी वेगवेगळ्या खोल्या बांधण्यात आल्या होत्या. नेहमीप्रमाणे मंगळवारीसुद्ध काम सुरू होते. कामगार कामात व्यस्त असताना अचानक खोल्यामध्ये एकामागून स्फोट झाले. उपस्थित असलेल्या मजुरांपैकी रजाकभाई (६०) यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. तसेच यामध्ये काही मजूर गंभीर असून जखमी झाले. धम्मपाल सीताराम खंडेराव, मंगेश भीमराव खंडेराव, रिना मंगेश खंडेराव, दादाराव नवघरे, सुरेश नामदेव दामोदर अशी जखमींची नावे आहेत. ते सर्वच तांदळी येथील रहिवासी आहेत. सर्वजण फटाका कारखान्यात काम करीत होते. स्फोट व आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पातूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
नागपुरात भाजप नेत्याच्या घराला आग
भारतीय जनता पक्षाचे नागपूर येथील नेते नागपूर मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विक्की कुकरेजा यांच्या जरिपटका भागातील घराला सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने विक्राळ रूप धारण केले. संपूर्ण मजलाच कवेत घेतला. घरात सर्वात्र धुळाचे लोळ असल्याने कुटुंबीय प्रसंगावधान राखत घराबाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ५ बंब घटनास्थळी दाखल झाले. चारही बाजुने पाण्याचा मारा सुरू करण्यात आला. सुमारे २ तासांच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. जरीपटक्यातील कुकरेजानगरात कुकरेजा यांचे तीन माळ्यांचे घर आहे. खाली कुटुंबीय राहतात तर वरच्या माळ्यावर कर्मचाऱ्यांसाठी कमरे काढण्यात आले आहेत. त्यापैकी एका कमऱ्यातून आगीला सुरूवात झाल्याचे सांगण्यात येते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा