तोतया पोलिस आणि वृद्धांचे 25 हजार !

0

अमरावती – वृद्ध ताराचंद शामराव पाचपोर यांना पोटाचा आजार असल्याने त्यांनी उपचार घेण्यासाठी काल वलगावच्या बँकेमधून 25 हजार रुपय काढले आणि आज अमरावती शहराच्या चित्रा चौकात एका फुटाण्याच्या दुकानात गेले असता एक अज्ञात मी पोलिस असल्याची बतावणी केली. पाचपोर यांच्या खिशातील 25 हजार रुपये काढून त्यांचे हात पकडून हा इसम त्यांना सोबत घेऊन गेला.
काही अंतरावर गेल्यावर तिथून पळ काढताना तोतया पोलीस असल्याचे समजताच पाचपोर यांनी आरडाओरड केली. सिटी कोतवाली पोलिसात तक्रार दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा तोतया पोलिस बुलढाणा जिल्ह्यातील असून आजम खान अफजल खान पठाण नामक या आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपीविरुद्ध अनेक इतर जिल्ह्यांमध्ये तोतयागिरी करण्याचे गुन्हे असण्याची दाट शक्यता असल्याचे त्यासोबतच कोतवाली बस स्टॅन्ड जवळील एक मंगळसूत्र चोरीची आहे

 

अंबाझरी धरणाला असतील चार दरवाजे! | Shankhnaad News #shankhnaadnews #live