या मंत्र्यांकडून शेतकरी विधवांचा अपमान

0

काँग्रेसची टीका

(Yawatmal)यवतमाळ – (Union Home Minister Amit Shah)केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी (MP Rahul Gandhi in Lok Sabhav)लोकसभेत खासदार राहुल गांधी यांची नक्कल करीत कलावती बांदुरकर यांना पंतप्रधान मोदी यांनी मदत केली, अशी खोटी माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या वक्तव्यामुळे लाखो शेतकरी विधवा महिलांचा अपमान झाला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी (State President of Women Congress Committee Sandhyatai Savvalakhe)महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली. मणिपूर येथे हिंसाचाराच्या घटना घडत असताना भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी शांत आहे. मंत्री स्मृती इरानी यांच्यावरही सव्वालाखे यांनी ताशेरे ओढत संताप व्यक्त केला. दरम्यान, माजी मंत्री (Shivajirao Moghe)शिवाजीराव मोघे, माजी मंत्री (Prof. Vasant Purke)प्रा. वसंत पुरके, माजी मंत्री (Manikrao Thackeray)माणिकराव ठाकरे यांनीही केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.