पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

0

 

(Yawatmal)यवतमाळ– (West Vidarbha)पश्चिम विदर्भात पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण झाली. गेल्या काळात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे खरिपावर शेतकऱ्यांची भिस्त होती. यंदा पश्चिम विदर्भात 86 टक्के शेतकऱ्यांना 2 कोटी 29 लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले. सर्वाधिक कर्ज यवतमाळ जिल्ह्यात 101 टक्के देण्यात आले. मात्र, जून, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे आतापर्यंत पश्चिम विदर्भात 390 महसूल मंडळात नुकसान झाले. परिणामी शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत 6 लाख 85 हजार हेक्टरवर पंचनामे देखील करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.