बुलडाण्यातील देऊळगाव राजानजिक असोला फाटाजवळ अपघात
बुलडाणा. नागपूरहून औरंगाबादच्या (Nagpur to Aurangabad ) दिशेने जाणाऱ्या राही ट्रॅव्हल्स या खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (accident on Samriddhi Highway ) झाला. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा (Asola Fata near Deulgaon Raja in Buldana District ) गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, बसमधून प्रवासी बाहेर पडत होते. यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले. हजारो कोटींचा खर्च करुन उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. वन्य प्राण्यांमुळे, टायर फुटल्याने याठिकाणी आत्तापर्यंत अपघात झाले आहेत. आज पहाटे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला आहे. जखमींना जालन्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महामार्गावरील सततच्या अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला लोकार्पण झाले. तेव्हापासून ते 19 जानेवारी आजपर्यंत 40 ते 45 दिवसात जवळपास 20 अपघात झाले आहेत. शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. रुग्णांना जालन्यातील खसगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली दिसली.
कार अपघातात शिक्षकाचा मृत्यू
दुसऱ्या एका अपघातात एकाचा मृत्यू झाला. राहता – शिर्डीनाजिक अवजड कंटेनर आणि कारच्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला. अहमदनगर मनमाड महामार्गावर शिर्डीनजिक झालेल्या अवजड कंटेनर आणि कारच्या अपघातात रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ प्राचार्य राजेंद्र बर्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात बर्डे यांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
युगुलाचा करूण अंत
एका प्रेमीयुगुलाचा समृध्दी महामार्गावर करुण अंत झाला आहे. एका भरधाव ट्रकने दोघांना चिरडले. औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी परिसरात या दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. तिच्यासह असीम उर्फ बुच्चन अब्बास (20) नावाच्या तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. असीम आणि या अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. दोघेही दिल्लीचे राहणारे आहेत. दोघेही घरातून पळून आले होते.