सामूहिक अत्याचारानंतर हत्या नंतर पुन्हा बलात्कार

0

नागपूर जिल्ह्यातील खापा येथील घटना : शेतमजूर महिलेत्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

नागपूर. उपराजधानी नागपुरात (Nagpur) गुन्हेगारी घटनांचा ग्राफ सातत्याने उंचावत आहे. ग्रामीण भागही गुन्हेगारीत मागे नाही. नागपूरपासून जवळच असलेल्या खापा पोलिस ठाण्याच्या (Khapa Police Station ) हद्दीत हाकी दिवसांपूर्वी कापूस वेचणाऱ्या महिलेचा मृतदेह शेतात बेवारस अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाच्या अवस्थेवरूनच तिचा खून झाल्याचे स्पष्ट होत असल्याने खापा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला होता. या प्रकरणात संशयित तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या महिलेवर तिघांनी बळजबरीने सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर हत्या केली. ऐवढ्यावरच ते तिघे थांबले नाही, हत्या केल्यानंतरही तिच्यावर बलात्कार केल्याचे (Gang rape followed by murder followed by rape again) पोलिस तपासात समोर आले आहे. घटना उघडकीस आल्यापासून समाजमन संतप्त झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील खापा पोलिस ठाण्यांतर्गत सुरेवानी गावात 12 जानेवारीला ही महिला एकटी शेतात कापूस वेचत होती, त्यावेळी तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी संशयित तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, महिला शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती, यावेळी ती शेतात एकटी असल्याचे पाहून 3 जण तिच्याजवळ आले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून या तिघांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. महिलेने यास विरोध करताच तिघांकडून महिलेला बेदम मारहाण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यावरच न थांबता त्या तिघांनी तिची कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावर देखील सामूहिक बलात्कार केला.
तिच्या पतीला वाघाच्या शिकारीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. तो सध्या कारागृहात असल्याने ती शेतीची कामे करत होती. घरी एकटीच राहत असल्यामुळे वासनांध आरोपी आबू ऊर्फ दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील यांची तिच्यावर वाईट नजर होती. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित तिघांना अटक केली असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिस पुढील तपास करत आहेत.