नाशिक-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात, 10 ठार तर 12 गंभीर

0

 नाशिक शिर्डी महामार्गावर सिन्नर-शिर्डी दरम्यान पहाटेच्या सुमारास मोठा भीषण अपघात झाला. साईभक्तांवर काळाचा घाला घालण्यात आला. या अपघातात 10 साईभक्तांचा मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झालेत. पाथरे गावाजवळच्या हॉटेल वनराईजवळ ही दुर्घटना घडली. खासगी आराम बस आणि ट्रकची (Private Bus – Truck Accident News) समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

साईच्या दर्शनासाठी ठाणे, अंबरनाथ परिसरातील भाविक खासगी बसने जात होते. बसमध्ये 50 लोक होते. नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बसमधील 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा