मुलीच्या हत्येसाठी बाप- भावाला जेल ९ वर्षांनी मुलगी अचानक प्रकटली : साऱ्यांनाच धक्का

0

 

नागपूर. अल्पवयीन मुलगी एक दिवस अचानक घरातून बेपत्ता झाली. पोलिसांच्या थेयरीनुसार मुलीच्या बाप आणि भावानेच तिचा खून केला होता. याच आरोपांतून त्यांना अटक करण्यात आली होती. पुढे जेलही झाली (Father-brother jailed for daughter’s murder). वडील एकावर्षाची शिक्षा भोगून घरी परतले. भाऊ अजूनही कारागृहात आहेत. तिकडे बेपत्ता मुलगी तब्बल ९ वर्षांनी घरी परतली, तीसुद्धा अगदी सुखरूप. तिला बघून साऱ्यांनाच धक्का बसला. नेमके काय सुरू ते कुणालाच कळत नव्हते. हा संपूर्ण घटनाक्रम मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh ) टोकावरचा आणि नागपूर जिल्ह्याला (Nagpur District ) लागून असलेल्या छिंदवाडा (छिंदवाड्यात) जिल्ह्यात घडली. या प्रकारानंतर पोलिसांच्या भूमिकेकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. बाप- लेकाने जेलमध्ये घालविलेला वेळ परत येणार कसा, त्याची भरपाई होणार कशी, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

असा आहे घटनाक्रम

छिंदवाड्याच्या जोपनाला गावातील रहिवासी शन्न उइके यांची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी २०१४ मध्ये अचानक घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी सर्वत्र तिचा शोधही घेतला. परंतु, ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. या घटनेच्या ७ वर्षांनी पोलिसांनी शन्न उइकेच्या घराजवळ खोदकाम केले. त्यात हाडांचा सापळा आणि बांगड्या मिळाल्या. या प्रकरणी पोलिसांनी बेपत्ता युवतीचा भाऊ सोनूवर हत्येचा आरोप ठेवला. तर वडिलांनी त्याला पोरीला दफन करण्यास मदत केली असल्याचा पोलिसांचा दावा होता.
बाप – मुलानेही दिली होती कबुली
सुनावणीवेळी बाप-लेकानेही हत्येची कबुली दिली होती. त्यामुळे न्यायालयाने दोघांना शिक्षा सुनावली. १ वर्षांनी बापाला जामीन मिळाला परंतु सोनू अद्याप जेलमध्ये आहे. आता बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी पुन्हा जिवंत घरी आली. दरम्यानच्या काळात तिचे लग्नही झाले. इतक्या वर्षांनी मृत असलेली मुलगी गावात जिंवत समोर आल्याने गावकरीही हादरले. मुलीला पाहून आई बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. या घटनेवेळी गावकरी जमा झाले होते.
दबाव टाकून गुन्हा कबूल करवून घेतला
या प्रकरणात पोलिसांनी बाप-लेकावर दबाव टाकून हत्येचा गुन्हा कबूल करून घेतला. पोलिस अधिकाऱ्याने गुन्हा रद्द करण्यासाठी २ लाख रुपये मागितले. आम्ही १२१ हेल्पलाईनवर कॉल केला. परंतु कुणी मदत मिळाली नाही. त्यामुळे मला आणि मुलाला जेलमध्ये जावे लागले. मी जामीनावर बाहेर आलो मात्र मुलगा अजूनही जेलमध्ये असल्याचे वडिलांनी सांगितले.