सलमान खानला उच्च न्यायालयाचा दिलासा, विरोधातील प्रकरण फेटाळले

0

मुंबई: पत्रकाराशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) मोठा दिलासा मिळाला (Actor Salman Khan) आहे. अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने सलमानविरुद्ध बजावलेले समन्स फेटाळत हायकोर्टाने संपूर्ण प्रकरणच फेटाळले आहे. न्या. भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. यासंदर्भात पत्रकार अशोक पांडे यांनी सलमानवर धमकवल्याचा आरोप होता. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने सलमानविरोधातील या प्रकरणातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात दाखल असणारी तक्रार चुकीची असल्याचे म्हणत हे प्रकरण रद्द केले आहे. सलमानसाठी हा मोठा दिलासा आहे.

हे प्रकरण असे की, पत्रकार अशोक पांडे अंधेरीमध्ये सलमानचा व्हिडिओ करत होते. तेव्हा त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड नवाझ शेखवर ठेवण्यात आला होता. सलमानने केवळ गैरवर्तन केले नाही तर त्याचा मोबाइलही हिसकावला होता. या प्रकरणी अशोक पांडे यांनी यापूर्वी अंधेरी येथील दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावर अंधेरी महानगर न्यायालयाने सलमानला समन्स पाठवले होते. यावर सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली