नागपूर : ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) नागपूर तर्फे लेखक सुभाष कौशिककर लिखित “कोरियन युध्दाचा इतिहास” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता गृहिणी समाज, व्हॉलीबॉल, मैदानाजवळ, हनुमाननगर येथे आयोजिण्यात आला आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त कर्नल अभय पटवर्धन उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महामंडळ, विदर्भचे सचिव अॅड अविनाश तेलंग असतील.
कार्यक्रमाचे संचालन सुषमा जागीरदार करणार आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ) चे अध्यक्ष प्रा. प्रभुजी देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत तुळणकर, सचिव ऍड. अविनाश तेलंग यांनी केले आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा