अखेर ते अंकुर कृषी केंद्र उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी केले सील

0

 

(Khamgaon)खामगाव : (Buldhana)बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील नागापूर येथील पिंटू लोखंडकार या शेतकऱ्याला खामगाव येथील अंकुर कृषी केंद्रातून सोयाबीनचे तीन हजार सहाशे रुपये किंमत असलेले सोयाबीनचे बियाणे चार हजार दोनशे रुपयाला विकून शेतकऱ्याची एका बॅगमागे सहाशे रुपयांनी आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने केली होती. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम अवथळे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने, कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचवून, चौकशीअंती संबंधित कृषी केंद्र चालकाने शेतकऱ्याला जादा दराने सोयाबीन विकल्याचे निष्पन्न झाल्याने, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी कारवाई करीत अंकुर कृषी केंद्र सील केले आहे. या कृषी केंद्र चालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासंदर्भात जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे शिफारस केली आहे. सोबतच जिल्ह्यातील कृषी केंद्र चालक छापील किमतीपेक्षा अतिरिक्त दराने बियाणे विक्री करीत असल्यास शेतकऱ्यांनी याची तक्रार कृषी विभागाकडे सादर करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. उद्या अंकुर कृषी केंद्र संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली असून, आता या केंद्र चालकांचा परवाना कायमस्वरूपी रद्द होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.