(Mumbai)मुंबई : (Pankaja Munde)पंकजा मुंडेनी त्यांची व्यथा बोलून दाखवली. ज्यांनी भाजप शून्यातून निर्माण केला, त्याचं आज अस्तित्त्व काय उरलंय? पंकजा मुंडेचा पराभव का झाला हे आम्ही वेगळं सांगायची गरज नाही. खरेतर (Gopinath Munde)गोपीनाथ मुंडे आज असते तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असत . त्यामुळे राजकीय कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता योग्यवेळी निर्णय घ्यायला हवा असे प्रतिपादन सेना नेते खा संजय राऊत यांनी केले. अहिल्यादेवी होळकरांचा सारा देश ऋणी आहे.दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील फोटो हटवल्यानंतर हे नामकरण सुचले आहे. पण या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला जर नाव मिळत आहे तर विरोध करायाचं काही करण नाही. कुस्तीगीरांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारनं भूमिका घेतली पाहिजे.
देशाचा गौरव असलेल्या कुस्तीपटुंना न्याय मिळावा ही संपुर्ण देशाची भावना आहे. किंबहुना त्यांना न्याय नाकारून चालणार नाही.
किर्तीकर जे बोलले ते मी ऐकलंय, त्यांनीही परत ऐकावं अशी अपेक्षा आहे. (Gajanan Kirtikar)गजानन किर्तीकर हे आमच्या इथे जेष्ठ होते परंतु आता ते तिथे आहेत की नाही माहीत नाही. मुळात त्यांच्यासारखे जेष्ठ नेते जेव्हा बोलतात तेव्हा त्यामागची कथा स्पष्ट आहे.
12 जूनला (Nitish Kumar) नितीश कुमारांनी देशांतील सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र पाटण्याला बोलावलं आहे.
त्याला उद्धव ठाकरे जाणार आहेत असेही राऊत म्हणाले.