350 सोन्याच्या होनांनी होणार साजरा शिवराज्याभिषेक सोहळा

0

 

(Nashik)नाशिक -350 सोन्याच्या होनांनी यावेळी साजरा होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा.
यंदाच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी नाशिककरांना हा खास मान मिळाला असून नाशिककर शिवभक्त यानिमित्ताने रायरेश्वराच्या मंदिराची सजावट करणार असून नाशिकचे पाच ढोल पथक, रायरेश्वराच्या पालखीत नाशिकचे वारकरी सहभागी होणार आहेत. नाशिकच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानाच्या वतीने शिवभक्तांसाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे.दरम्यान,गडावर कुणीही प्लास्टिक बाटली घेऊन न जाण्याचे तसेच अंमली पदार्थांचे सेवन न करण्याचे आवाहन (Karan Gaykar) करण गायकर, समिती सदस्य- स्वराज्य संघटना यांनी केले आहे.