
अमरावती – नागपूर (Amravati – Nagpur)महामार्गावर धावत्या बसवर गोळीबाराची घटना घडली आहे. एखाद्या चित्रपटातला सीन वाटावा अशा या घटनेने मोठी खळबळ उडाली. मध्यरात्री अचानक अज्ञातांकडून खासगी बस चालकावर गोळीबार केला गेला. यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून एक खासगी बस नागपूरला निघाली होती. प्रवाशांनी भरलेली ही बस अमरावती नागपूर महामार्गावर तिवसा जवळ येताच गोळीबाराची घटना घडली. अज्ञातांनी बसचा पाठलाग केला. त्यानंतर बसच्या आडवी गाडी घेत गोळीबार करण्यात आला.
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















