पंचसूत्री पाळा, राज्यात विमानतळावर होणार परदेशी प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग

0

– राज्य शासनाची कोरोना संदर्भात बैठक, आरोग्यमंत्र्यांनी दिली विधानसभेत माहिती

नागपूर : सध्या जगात चर्चेत असलेल्या कोरोना प्रकारचा राज्यात एकही रुग्ण नाही. आपल्याकडे 95 टक्के कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झाले असल्याने जनतेने घाबरून जाऊ नये, यापूर्वीचीच पंचसूत्री पाळावी, केंद्राचे निर्देश आल्यानंतर राज्य शासन,आरोग्य विभागकडून पुढील निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.

खबरदारी म्हणून लहान मुले आणि वृद्धांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, शक्यतो मास्कचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. यासोबतच येत्या सोमवारपासून आंतरराष्ट्रीय विमानांनी राज्यात येणाऱ्या प्रवाशांचे विमानतळावर थर्मल टेस्टिंग केले जाणार असल्याची माहिती दिली. आज याविषयीचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने सायंकाळी तातडीने टास्क फोर्स आणि संबंधितांची बैठक घेतली. या विषयाची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

सोशल मीडियावर सध्या सुरू असलेल्या कोरोना संदर्भातील भयभीत करणाऱ्या बातम्यांच्या त्यांनी यावेळी उल्लेख केला. जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आपल्याकडे काय उपाय योजना या संदर्भात विरोधकांनी आज प्रश्न विचारला होता. सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री आदींची बैठक झाली. या निर्णयाची माहिती देताना आरोग्य मंत्री म्हणाले चीन,अमेरिका, इंग्लंड आदी चार देशांमध्ये बीएफ 7 प्रकारचा कोरोनाचा नवीन प्रकार वाढत असून याची संक्रमण क्षमता दहा पट अधिक असल्याचे वृत्त सर्वसामान्यांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. यापूर्वीच्या पंचसूत्रीचे पालन करण्यावर भर दिला गेला. यात टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंटचा प्राधान्याने समावेश आहे. कुठल्याही परिस्थितीत जनतेने घाबरून जाऊ नये, महाराष्ट्रात अद्याप या प्रकारचा एकही रुग्ण नाही .देशात गुजरात मध्ये २,ओरिसात दोन रुग्ण आढळून आले असले तरी काळजीचे कारण नाही याचा पुनरुच्चर सावंत यांनी केला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा