सुधीर मुनगंटीवार यांनी चित्र अमृत प्रदर्शनीचे केले कौतुक

0

नागपूर, 22 डिसेंबर 2022धरमपेठ शिक्षण संस्थेद्वारा संचालित नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर यांच्यावतीने मध्‍यवर्ती संग्रहालय, नागपूर येथे महाराष्‍ट्र सरकारच्‍या सांस्‍कृतिक कार्य विभागाच्‍या पुरातत्‍व व वस्‍तुसंगहालय संचालनालय मुंबई यांच्‍या सहकार्याने चित्र अमृत प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले आहे. विदर्भातील 75 कलाकारांनी स्वातंत्र्यपूर्व व पश्‍चात भारतातील विविध क्षेत्रातील थोर व्यक्तींचे चित्रण केलेल्‍या या प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. प्रदर्शनीची पाहणी करून त्‍यांनी कलाकारांचे कौतुक केले. यावेळी सचिव सौरव विजय, उपसचिव विजय थोरात, अवरसचिव सुमंत पाष्टे, नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे प्राचार्य डाॅ. रविंद्र हरिदास, कलाशिक्षक मौतिक काटे, अतुल वरेरकर, अभिरक्षक जया वाहने, विनायक निटुरकर, किशोर बोरकर, सुचेंद्र मंडपे, निलेश विरखरे, ममता वाढवले, सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नटराज आर्ट कॉलेजचे चे विद्यार्थी उपस्थित होते.