विमानात एअर होस्टेसशी छेडछाडीचा प्रकार, विदेशी नागरिकाला अटक

0

 

मुंबईः (MUMBAI)मद्यधुंद अवस्थेत एअर होस्टेसशी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार बँकॉकहून मुंबईला येणाऱ्या (AIR INDIO)एअर इंडिगोच्या विमानात घडला असून याप्रकरणी पोलिसांनी एका विदेशी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. एरिक हॅराल्ड जोनास वेस्टबर्ग असे या प्रवाशाचे नाव असून तो ६३ वर्षांचा आहे. तो(SWEDEN) स्वीडनचा नागरिक असल्याची माहिती (Swedish National arrested for Molesting Air Hostess) असून त्याला अटक करण्यात आली. एअर इंडिगोच्या विमानात एअर होस्टेसकडून प्रवाशांना जेवण दिले जात असताना हा प्रकार घडला. संबंधित एअर होस्टेसने या घटनेची माहिती वैमानिकांना दिली व त्यानंतर विमान मुंबई विमानतळावर उतरताच(CISF) सीआयएसएफ ने या विदेशी नागरिकाला ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांनी(MUMBAI POLICE) त्याला नंतर अटक केली.

यासंदर्भात दाखल तक्रारीनुसार, विमानात जेवण देण्याचे काम सुरु असताना प्रवाशाने २४ वर्षीय एअर होस्टेसचा हात पकडत तिच्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. (Air Hostess)एअर होस्टेसने आपला हात सोडवून घेतल्यावर त्याने तिचा हात पुन्हा पकडत तिला स्वत:च्या दिशेने खेचले. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून प्रवासी एरिक वेस्टबर्ग याला समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपीच्या वकीलांनी आरोप फेटाळले आहेत. वयोमानानुसार एरिक वेस्टबर्गचे हातपाय थरथरतात. त्यामुळे पॉस मशीनवर पेमेंट करताना त्याने मदतीसाठी एअर होस्टेसचा हात पकडला व यामागे चुकीची भावना नव्हती, असा दावा वकीलांनी केलाय.

 

अरबीचे सालन आणि कोरिएंडर चिकन | Arbi salan Recipe | Coriander Chicken Recipe | Ep No. 105

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा