सिरोंचा. उन्हाळ्याच्या तोंडावर जंगलातील सागवनाची झाडे तोडून तस्करीला वेग आला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा वनपरिक्षेत्रातील चिटूर ते दुब्बापल्लीच्या जंगलात (Chitoor to Dubbapalli forests in Sironcha forest range of Gadchiroli district) वनकर्मचारी आणि सागवन तस्करांमध्ये मध्यरात्री चकमक (Clashes between forest personnel and timber smugglers ) झाली. गस्त घालत वनकर्मचारी अगदी तस्कर असलेल्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचले. ते दिसताच तस्करांनी त्यांच्या दिशेने दगड भिरकावणे सुरू केले. जवानांनी स्वतःचा बचाव करीत प्रत्युत्तरादाखल हवेत गोळीबार केला. यामुळे घाबरलेल्या तस्करांनी बैलगाड्या जागीच सोडून पोबारा केला. कर्मचाऱ्यांची त्यांचा पाठलागही केला. पण, ते पळून जाण्यात यशस्वी झाले. वनकर्मचाऱ्यांनी बैलबंड्यांमधून सागवणाची लाकडे हस्तगत केली आहे. परिसरात सर्वत्र याच थरारक घटनेची चर्चा आहे. वनांलगत राहणाऱ्यांच्या दाव्यानुसार होळीनंतर जंगलातील लाकूड तस्करीला वेग येतो. जवळपास संपूर्ण उन्हाळा व पावसाळ्याच्या सुरुवातीवर्यंत लाकूडं चोरून नेण्याचे प्रकार चालतात. यामुळे वन विभागाने पाळत वाढविण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सिरोंचा आणि आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील अधिकारी व वनकर्मचारी शुक्रवारी रात्री संयुक्त गस्त घालत होते. दुब्बापल्ली जंगलात कर्मचारी पाळत ठेवून असताना मध्यरात्री एक वाजताच्या समुसारस साग तस्कर बैलबंडीमध्ये सागवनी लठ्ठे भरुन येत असल्याचे दिसले. कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता सागतस्करांनी वनकर्मचाऱ्यांवर दंगडांचा मारा सुरू केला. साग तस्करांना पांगविण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी पिस्तलमधून हवेत गोळीबार केला. यामुळे घाबरलेले सागतस्कर बैल व बंड्या सोडून अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले. घटनास्थळावरुन १४ बैल, ७ बैलगाड्या व सागाची ३१ लाकडे असा मुद्देमाल जप्त केला. मध्यरात्री एक वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत वनाधिकाऱ्यांनी रात्री जागून काढत ही कारवाई केली. जप्त केलेला माल डेपोमध्ये हलविण्यात आला.
सिरोंचा वनविभागाच्या उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षे अधिकारी पी.एम. पाझारे, आर.डी.तोकला, वनपाल एम.बी.शेख, एस.एस. नीलम, वनरक्षक आर. के. शेरकी, ए.एस. नैताम, आर. वाय. तलांडी, पी.टी. दर्रो, एम. जे. धुर्वे, वाहनचालक आर. बी. आत्राम, ए. जी. आत्राम तसेच आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील वनरक्षक आर. पी. गेडाम, ए.डब्ल्यू. तलांडी, सी. पी. दुर्गे तसेच रोजंदारी वनमजूरांनी पार पाडली. पुढील कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. पाझारे करीत आहेत.