माजी मंत्री केदारही म्हणतात , नियम सर्वांनाच सारखा !

0

नागपूर :पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूर आणि नाशिकमध्ये एबीफॉर्म देणे, उमेदवार बदलणे ,समर्थन देणे यावरून सुरू झालेले नाराजी नाट्य निकालानंतरही संपण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा देणारे बाळासाहेब थोरात यांच्यातील वादाने आता पक्षात उभी फूट होणार की काय, असे वळण घेतल्याचे दिसत आहे. संधीच्या शोधात असलेली भाजप सावध पवित्र्यात आहे. नागपुरात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देण्यासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विश्वासात न घेता बैठक घेतली व परस्पर पाठिंबा जाहीर केला. यानंतर मुंबईत बैठक झाली शिवसेनेने आपला नागपूर येथील उमेदवार बदलला आणि मविआचे अडबाले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांनी जाहीर केला. पटोले यांना विश्वासात न घेता केदार यांनी व्यक्त केलेली पक्षाची भूमिका यावरून या तिघांमध्ये संबंध अधिकच ताणले गेले. आता माजी मंत्री सुनील केदार यांनी थोरात -पटोले वादात पक्षश्रेष्ठींनी उद्या कुणावरही कारवाई केली तर वाईट वाटण्याचे कारण नाही असा इशारा कोणाचेही नाव न घेता दिला आहे. पटोले मनमर्जीने वागत असल्याचा आरोप माजी आमदार डॉ आशीष देशमुख यांनी यापूर्वीच केला आहे. पटोले यांना हटविण्याची मागणी केली आहे.पटोले यांनी कारवाईची भाषा वापरल्याने आता केदार यांनी देखील पक्षश्रेष्ठी नियमानुसार कुणावरही कारवाई करू शकतात असे सांगत पटोले यांनाच समजने वालो को.. इशारा काफी है….असेच संकेत दिले आहेत.