विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले यांचे निधन

0

विदर्भातील सुप्रसिद्ध उद्योजक व धरण बांधकाम तज्ञ , समाज सेवक , धरमपेठ शिक्षण संस्थेचे , दी ब्लाइंड रिलिफ असोसिएशनचे , विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे, नरकेसरी प्रकाशनचे माजी अध्यक्ष, बी सी सी आय चे माजी कोषाध्यक्ष, *श्री प्रभाकरराव उपाख्य भैय्यासाहेब मुंडले यांचे रात्री ८.३० वाजता हृदयविकाराने दु:खद निधन झाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले दुःख

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि ज्येष्ठ उद्योजक, समाजसेवक भैयासाहेब उपाख्य प्रभाकरराव मुंडले यांच्या निधनाने सामाजिक दातृत्त्व जपणारे, मनाने अत्यंत संवेदनशील असलेले एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. माझे त्यांच्याशी अत्यंत जवळचे आणि कौटुंबिक संबंध होते. नागपुरातील शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. नागपुरातील अंध विद्यालय, बीआरए मुंडले, आरएस मुंडले अशा अनेक संस्थांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. ‘तरुण भारत’चे संचालन करणार्‍या श्री नरकेसरी प्रकाशन संस्था, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे सुद्धा ते अध्यक्ष होते. समाजाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अत्यंत मोठे योगदान दिले. अत्यंत मनमिळावू, लहानांपासून थोरापर्यंत प्रत्येकाचा सन्मान जपणार्‍या भैयासाहेब मुंडलेंना माझी विनम्र श्रद्धांजली.

DCM Devendra Fadnavis :