माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देविसिंह शेखावत यांचे निधन

0

पुणे : माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Devisingh Shekhawat Demise) त्यांना दोन दिवसांपूर्वी, हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देवीसिंह शेखावत हे अमरावती शहराचे पहिले महापौर होते. ते काँग्रेसचे सक्रीय सदस्य होते. १९६५ मध्ये त्यांचा विवाह प्रतिभाताई पाटील यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.
देवीसिंह शेखावत हे विद्याभारती शिक्षण संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष होते. कॉंग्रेस पक्षाचे सक्रीय सदस्‍य असलेले डॉ. शेखावत हे १९८५ मध्‍ये अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. ते १९९१ मध्‍ये अमरावतीचे प्रथम महापौर बनले. १९९५ च्‍या विधानसभेच्‍या निवडणुकीत मात्र त्‍यांना पराभव पत्‍करावा लागला होता. अनेक दशके ते अमरावतीच्‍या राजकीय आणि शैक्षणिक वर्तूळात कार्यरत होते. राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कारकीर्दीनंतर ते प्रतिभाताईंसह पुण्‍यात वास्‍तव्‍याला होते

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा