
नवी दिल्ली NEWS DELHI : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षासाठी वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे आता देशातील ८० कोटी लोकांना पुढील पाच वर्ष मोफत रेशन मिळणार आहे. (Free Ration Scheme) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ही घटना केली असून देशातील गरीब जनतेला हे दिवाळीचे गिफ्ट असल्याचे मानले जात आहे.
छत्तीसगडमध्ये एक जाहीरसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली.केंद्र सरकारने कोव्हीड परिस्थितीनंतर २०२० मध्ये या योजनेची घोषणा केली होती. तेव्हापासून या योजनेला सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. आता मोदी यांनी ही योजना आणखी पाच वर्षे लागू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत सुमारे पावणेदोन लाख कोटी रुपयांचा खर्च येतो.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















