नागपूरवरून शिर्डीकडे पालखी पदयात्रा रवाना, 19 वे वर्ष – जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणुकीचे उत्साहात स्वागत

0

नागपूर : श्री साई सेवाश्रम साई बाबा मंदिर अयोध्या नगर येथून श्री शिर्डी साई द्वारकामाई पालखी पदयात्रा नुकतीच शिर्डीच्या दिशेने रवाना झाली. दिनांक 5 ते 31 मार्च या कालावधीत ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून यात्रेचे सलग 19 वे वर्ष आहे. श्रीराम नवमी उत्सव केल्यानंतर ही पदयात्रा माघारी फिरणार आहे. श्री साई मंदिर अयोध्या नगर येथून निघाल्यानंतर या मिरवणुकीचे विश्वकर्मा नगर, ओंकार नगर, साई मंदिर वर्धा रोड, रहाटे कॉलनी, रविनगर तसेच डिफेन्स कोंढाळी मार्गे तसेच जिल्ह्यात या पदयात्रेचे ठिकठिकाणी साईभक्तांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी श्री साई सेवा आश्रम अयोध्या नगरचे अध्यक्ष श्रीपतराव महाजन, गिरीश पांडव, विजय भाऊ मौर्य, राजेश बागडे,रवींद्र देशमुख, विजय बागडे,मंगेश भगत, राजेंद्र लक्षणे, देवेंद्र गुहे,मधुकर भांगे,पंढरी मस्के आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्यात साई पालखी पदयात्रेचे स्वागत, सहकार्य करणाऱ्यांचा श्री शिर्डी साई द्वारकामाई पदयात्रा सेवा समितीतर्फे सन्मान करण्यात आला.