गडकरींना धमकी, मास्टरमाइंड पाशाला आणले पोलिसांनी नागपुरात

0

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात दोनदा खडणीसाठी धमक्यांचे फोन करणारा जयेश पुजारीला हे फोन करण्यास बाध्य करणारा कुख्यात दहशतवादी अफसर पाशा देखील आता नागपूर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. आज नागपूर पोलिसांचे पथक बंगळूरवरून विमानाने घेऊन नागपुरात आले. आरोपीचे कस्टडी दरम्यान तपासात मोठे खुलासे होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्वतः पोलीस आयुक्त अमितेशकुमार या प्रकरणी सातत्याने यासंदर्भात लक्ष ठेवून आहेत. एनआयएची चमू देखील तपासासाठी नागपुरात आली होती. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करुन धमकी देण्यात आली होती. पगांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सखोल तपास सुरु केला. जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने हे धमकीचे कॉल आले होते. पहिल्यांदा दाऊद इब्राहिमचे नाव घेत 100 तर दुसऱ्यांदा 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.